ती आणि मी.
ती आणि मी.
ती नेमस्त,काटेकोर; मी बिनधास्त उडाणटप्पू.
ती घराच्या ४ भिंतीतही मजेत असणारी, तर माझा पाय घरात टिकत नाही.
ती पद्य, सूर! तर मी गद्य ,भाषणबाज...!
ती आडून आडून सुचवत राहणारी, तर मी रोकठोक, करू नये रे, करून ये रे..!! types.
ती सरस्वती, लेक माझी लाडकी, काहे दिया परदेस, आणि मी Nation wants to know..
ती मला kitchen management, वेगवेगळे पदार्थ शिकवते, मी तिला जगरहाटी नवीन नजरेतून शिकवायला पाहते.
तिला वाटतं, तिच्या लेकाचं कधीच काही चुकत नाही. मला माहितीये तिच्या लेकाच्या किती चुका मी सांभाळून घेते..
ती B.A. मी MBA
तिला धार्मिक कार्यांचा सोस, मला सामाजिक कामाचा..
चलाख वाचकांच्या लक्षात आलच असेल ना मी कोणाबद्दल बोलतेय!?
हं.मी मिसेस आपटेंबद्दलच बोलतेय.आम्ही दोघीही एकमेकांपेक्षा अगदी वेगळी व्यक्तिमत्व आहोत.आणि तरीही आम्ही मायेच्या संबंधांनी जोडल्या गेलो आहोत; कारण? समजूतदारपणा. कुटुंबव्यवस्थेवर, एकमेकांवर असणारा विश्वास.. एकमेकांबद्दलचं प्रेम. आणि आयुष्याकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन.
छोटी मोठी गडबड तर होतेच ना..! आता असं बघा! मी काही फारशी धार्मिक वगैरे नाही. त्यामुळे मिसेस आपटेचं सोवळं ओवळं सांभाळणं, विशेषतः सणासुदीला, मला जरा जडच जातं. पण मी आजूबाजूची मदत करून, बाकीच्या कामांची जबाबदारी घेऊन हि गोष्ट subset करायचा प्रामाणिक प्रयत्न करते हे त्यांना जाणवलंय त्यामुळे एकंदरीतच त्याही काही तक्रार करत नाहीत. असं सांभाळून घेणं जमू लागतं हळूहळू.
सुरुवातीला ३ - ४ वर्षे थोडी अवघडच गेली. पण आम्ही एकमेकींच आपापल्या आयुष्यातलं महत्व पक्कं जाणून आहोत. एकाच घरात समांतर आयुष्य जगतही आम्ही एकमकींना पूरक होईल असे वर्तन ठेवतो. असे understanding यायला काही काळ जावा लागतो. दोन दे, दोन घे करतानाही सतत स्वपरीक्षण करत राहून आपल्या चुका मान्य करणं नि त्या सुधारत राहणं हे सर्वांनीच करत राहावं लागतं. हे प्रयत्न जाणवले कि समोरचाहि प्रोऍक्टिव्ह होऊ लागतो. एकमेकांची आवडनिवड, विचार हळूहळू समजतात. तोवर संयम फार महत्वाचा. या बाबतीत मिसेस आपटेंना हजार टक्के मार्क.
एकत्र राहणं नाईलाजास्तव नव्हे तर by choice झालं कि आयुष्य अधिकच complete होऊ लागतं. हे सगळं लिहिण्यामागच कारण म्हणजे हल्ली एकत्र कुटुंबांत सुनेचा कसा कोंडमारा होतो, ती depression मध्ये कशी जाते, तिचा career कस बरबाद होतं, तिला डिपेंडेंट कसं बनवलं जातं या आणि अश्या प्रकारच्या पोस्ट्स गोंडस नावांनी खूप फिरत आहेत. आणि बरे वाईट अनुभव सगळ्यांनाच येत असल्याने त्या आपल्याला पटकन appealing वाटू लागतात. मला इतकच सांगायचंय कि लोकांच्या अनुभवांवरून आपल्या माणसांना judge करू नका. जरा वेळ जाऊ द्या. अवघड परिस्थिती असेल तर मोठेपणाने सांभाळा. मायेने माणसे कमवा.आणि खुश रहा... !
तर अश्या या आमच्या तिखट,आंबट, गोड, चुरचुरीत, कुरकुरीत, चटकदार सहजीवनाची सुरुवात आजच्या दिवशी काही वर्षांपूर्वी अशी झाली.
अमिता आपटे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा