Oman Pact


ओमानचे दुकम बंदर भारताला सैनिकी कारवायांसाठी, व्यूहरचनांसाठी, तसेच विविध गोष्टींच्या पुरवठ्यासाठी वापरायला देण्याच्या करारावर शिक्कामोर्तब. चाबहर बंदराच्या यशस्वी कामगिरी नंतर हिंदी महासागरात भारताची पुढची महत्वाची चाल.

अमेरिकेचे तेलसंदर्भातील मध्य पूर्व देशांवरील अवलंबित्व मोठ्या प्रमाणात कमी झाल्याने त्याचा मोठा परिणाम अमेरिकेच्या एकंदरीतच भू राजकारणासंबंधी धोरणांवर झाला आहे. सुरुवातीच्या काळात तेलसाठ्यांसाठी ओरबाडले जाणारे आणि नंतर पोटात साठलेल्या तेलामुळे जगभर अरेरावी करणारे हे मध्य पूर्वेकडील देश आता सावध, प्रगतिशील, उदारमतवादी भूमिका घेऊ लागले आहेत. जगाच्या राजकारणात टिकण्यासाठी आता अमेरिकेचा हात पकडून ठेवणे दिवसेंदिवस कठीण होत जाणार हे त्यांनाही जाणवले आहे. तर चीनचे विस्तारवादी धोरणं कधीहि आपल्याला गिळंकृत करू शकेल अशी भीती पोटात असल्याने तोही आश्वासक मित्र वाटत नाही. अश्या वेळी भारतासारखा मित्र एक मोठा आधार ठरू शकतो.

या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान मोदीजींची ओमान व्हिजिट भारताच्या दृष्टीने अतिशय महत्वाची आणि लाभदायक अशी ठरली आहे. चीनच्या हिंदी महासागरातील वाढत्या प्रभावाला आळा घालण्यासाठी भारताच्या समुद्री धोरणातील एक महत्वाचा करार ओमान बरोबर केला गेला. येथे मोदीजींची ओमानचे सुलतान सैय्यद काबूस बिन सैद अल सैद यांच्याशी भेट झाली. या भेटीदरम्यान दोन्ही देशांत झालेल्या करारानुसार भारताला दुःम बंदर भारतीय जहाजांच्या देखभालीसाठी वापरता येणार आहे. ओमानच्या दक्षिणपूर्वेला वसलेले हे बंदर इराणमधील चबहार बंदराच्याही जवळच आहे. Seychelles व मॉरिशस मधील बंदर बांधणी गृहीत धरता भारताच्या समुद्री सुरक्षा नकाशातील दुःम बंदर हा महत्वाचा पडाव आहे.

या करारामुळे एकिकडे चाबहर बंदराला मोठी support system मिळाली तर दुसरीकडे गद्वार बंदराला शह बसला. असा दुहेरी फायदा झाला आहे.आणि तेलवाहतुकिच्या द्रुष्टीने अत्यंत महत्वाची अशी ‘स्ट्रेट ऑफ होर्मुज’ ही चाबहर आणि दुक्म या बंदरांच्या टप्यात येते.

नजीकच्या काळात या बंदरात बरीच भारतीय वर्दळ चालू आहे. गेल्या सप्टेंबर मध्ये भारताची नौसेनेची लढाऊ पाणबुडी पश्चिमी अरबी समुद्रात लक्ष ठेवण्यासाठी म्हणून येथे डिप्लॉय केली गेली. नौदलाचे जहाज INS मुंबई आणि दोन P ८१ या लांबवर गस्त घालणाऱ्या विमानांसकट Shishumar-class या पाणबुडीनेही इथे प्रवेश केला. महिनाभर नौसेनेचे दल येथे लक्ष ठेवण्यासाठी व सहकार्य करण्यासाठी म्हणून तळ ठोकून आहे. हा करार होण्याच्या दृष्टीने या महत्वाच्या घटना होत्या असे दिसते.

या भेटीच्या एकत्रित अहवालात म्हटल्याप्रमाणे २००५ च्या व २०१६ साली रिन्यू केलेल्या परस्पर सैनिकी सहकार्याच्या करारामुळे द्विपक्षीय संबंध अधिकच मजबूत झाले आहेत. तसच दोनही देशांचे सागरी किनारे सुरक्षित झाले आहेत. ही नक्कीच समाधानाची बाब आहे.ऑगस्ट १७ मध्ये ओमानने UK बरोबरही असाच एक करार केला आहे. ज्यायोगे UK ची सर्वात मोठे लश्करी जहाजसुद्धा दुःकम मध्ये प्रवेश करू शकते व तळ ठोकू शकते.असो. संस्थागत सुसंवाद वाढवण्यासाठी, प्रादेशिक शांतता व सुरक्षितता राखण्यासाठी तसेच आतंकवादी कारवायांवर रोक लावण्याच्या दृष्टिकोनातून हा करार महत्वाचा आहे.

संरक्षणविषयक संबंध अधिक मजबूत व्हावेत म्हणून दोन्ही संरक्षण मंत्रालयांनी आपापल्या सेना, नौदल आणि हवाईदलाच्या एकत्र कवायती घेण्याचे कार्यक्रमही हाती घेतले आहेत. विविध संरक्षण विषयक प्रदर्शनांचे आयोजनही केले जाते आहे. विविध क्षेत्रात भारतीय कंपन्यांना भागीदारी तत्वावर १.८ बिलियन डॉलर्सची गुंतवणूक करण्याची परवानगी मिळाली आहे. तसेच तेल क्षेत्रातही भारताला ओमान बरोबर काम करण्याची संधी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यावेळी पंतप्रधानांनी ओमानचे उपपंतप्रधान व आंतरराष्ट्रीय संबंधाविषयक मंत्र्यांचीही आवर्जून भेट घेतली. जगभरातील सर्व प्रकारच्या आतंकवादाला एकत्रित होऊन टक्कर देण्याचा निर्णय या भेटीदरम्यान घेतला गेला.

ओमानमध्ये भारतीय वंशाचे एकूण ९.५ लाख लोक राहतात. येथील एकूण जनसंख्या ५६ लाख आहे. यामुळे भारतीय पंतप्रधानांचे स्वागत मोठ्या उत्साहाने केले गेले.

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट