लग्न

लग्न!
तरुण मुलामुलींच्या आयुष्यातला एक महत्वाचा पडाव !

 आतापर्यंत बसलेली आयुष्याची घडी सोडवून नव्याने घालायची. मग त्यात डिझाइन्स वरखाली होतात. आधीच्या घडीच्या घड्या नजरेला टोचत राहतात. कधी टोकाला टोक जुळत नाही. तर कधी त्या वस्त्राचे शेव आत बाहेर होतात. आपल्याला कॅबिनेटची सवय असते. आता ट्रंकेत किंवा साडी कव्हर मध्ये जागा मिळते. आणि आपली अशी अपेक्षा असते कि वॊर्डरोब मिळेल.!
जोडीने आयुष्य सुरु करताना असं जोडाजोड करणं, विजोड वाटणं, अपेक्षाभंग होणं असं सगळं होतंच असतं. पण जोडीदारांना एकमेकांबद्दल वाटणार्या प्रेम, आकर्षक, आदर, काळजी या नैसर्गिक भावनांच्या जोरदार प्रवाहात सगळं mostly धकवून नेलं जातं.

मुलींना तर या आयुष्याच्या वस्त्राला वाळवी लागली अशीही भावना होऊ शकते. मुलांनाही लग्नानंतर बरीच जुळवाजुळव करून घ्यावी लागते. नातेवाईक, मित्रमंडळीच नाही तर आईवडिलांबरोबरचे नातेही revise होते. एकत्र कुटुंबात तर तटस्थपणे नवीन जोडप्याचं स्वतंत्र आयुष्य घरातल्या सर्वांनाच जाणीवपूर्वक सवयीचं करून घ्यावं लागतं.
या आणि अशा सर्व adjustments करेकरेपर्यंत ४ ५ वर्षे निघून जातात. मग आयुष्याचा साचा हळूहळू स्थिरावू लागतो. या काळात मुलीचे करिअर चालू असेल तर त्या फ्रंट वर स्थैर्य असते. नवा संसार, नवीन माणसे, एखादे बाळ आणि त्यात नोकरी व्यवसाय, हे सगळे सुरवातीला जडच जाते. पण चांगल्या, सुस्थिर भविष्यासाठी हि उमेदवारीची वर्षे एक गुंतवणूक समजून नियोजन केले कि सगळ्यांच्याच अपेक्षांची सांगड कमीअधिक प्रमाणात नेटकेपणाने घालता येवू शकते.

दहा वर्षे झाली आज, आपटेबुवांशी लग्न करून. या घरात जुळवून घेताना किती गोष्टी टाकल्या आणि किती नव्याने स्विकारल्या. मी फक्त माझचं सांगत नाहिये, घरातल्या सगळ्यांनीच एकमेकांना समजून, जुळवून घेतलं.आपटेबुवा एक मोठ्ठा आणि घट्ट, चिकटच म्हणा ना, binding factor आहेत.
त्याने मला खूप शिकवलं. कल्पनाही केली नव्हती अशी दुनिया दाखवली. भल्या बुर्या प्रत्येक प्रसंगात तो खंबीरपणे माझ्या मागे उभा असतो.

Walking that extra mile, म्हणजे काय, ते त्याच्याकडून शिकावं. Eckhart Tolle म्हणतो तसं, “Live in Now” हे तत्वज्ञान जगण्याचा आम्ही दोघेही मनापासून प्रयत्न करतो.

लौकिक अर्थाने किंवा करिअर म्हणता येईल असे काम मी करत नाही पण लाखो रुपयांचे पँकेज मिळवून जे करायचे ते मी आत्ताही करतेय.शेवटी E = MC^2 हेच खरे. आपल्याला स्वता:बद्दल, आपल्या कामाबद्दल काय वाटते ते महत्वाचे. बाकिचे काय, आज आहेत आणि उद्या नाहीत. 

लग्न ही बेडी नाही, ते खर्या अर्थाने स्वातंत्र्य आहे. हे जाणवले कि या नात्याची गोडी अवीट होते.

#अमिता

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट