#DNA केतकी चितळे मँटर
#DNA
किती फालतु, पुचका पब्लिसिटी स्टंट म्हणून मी याकडे पूर्ण दुर्लक्ष केलेलं होतं. प… ण….
केतकीआँटी चितळे सध्या चांगल्याच फाॅर्मात आलेल्या आहेत. ( चाईल्ड काँन्सिलिंग करणार्या बत्तीस वर्षीय महिलेला आँटी म्हटलं तर राग न यावा.) मुमंनी पण त्यांच्या तक्रारीची दखल घेतलीये असं वाचलं.. त्यामुळे मनातले मुद्दे लिहून काढतेय..
तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे एका स्त्रिला अश्लाघ्य भाषेत ट्रोल करणे सर्वथा चूकच आहे, याचं कोणतंही समर्थन होऊच शकत नाही. याबाबतच माझं मत ठाम आहे. हो, तुम्हाला तिचं वागणं, बोलणं, मत कितीही खालच्या दर्जाचं वाटलं तरीही..
पुढचा मुद्दा असा की मराठी भाषेबद्दल तै जे बोलल्या किंवा जो वाद होतोय त्याबाबत मला काहीही मतप्रदर्शन करायचं नाहीये.
मला खटकलेला मुद्दा वेगळाच आहे. आणि त्यावर कोणीच आक्षेप घेतलेला मी वाचला पाहिला नाही. म्हणजे एकूण समाजाचंही तसंच मत असावं असं मला वाटतयं. म्हणून ही पोस्ट.
तर बैंनी मुलांकडून अवाजवी अपेक्षा ठेवू नका, असं समजावताना DNA चा मुद्दा उपस्थित केला. म्हणजे आडात नाही तर पोहर्यात कुठून येणार? असा काहीसा सूर असावा असं मला जाणवलं. अहो, म्हणजे शाळेत पहिला नंबर येणाऱ्याच्या मुलाचा पहिला नंबरच आला पाहिजे. Ronaldo चा मुलगा Ronaldo नाही तर Messi तरी निपजलाच पाहिजे आणि आईबाप हुषार नसतील तर मुल कुठून हुषार होणार? वगैरे फालतू चटरपटर! असं असतंय काय कुठे? जगात कोणते बालकपालक काॅपी टु काॅपी असतात?
शिक्षित, सुसंस्कृत पालकांना मुलांचं भविष्य सुरक्षित, उज्वल घडवण्याची संधी जास्त असते इथपर्यंत ठीक आहे. पण जसे
‘जल्मदाते’ तशी मुले असं कुठं नसतं हो बाssई!
प्रत्येक मुल आपापला intellectual realm घेऊन जल्माला येतं. आजुबाजूची परिस्थिती, अन्न, scope, संस्कार, वैयक्तिक आवडीनिवडी, संगत अशा शेकडो गोष्टींचा परिणाम व्यक्तीमत्व निर्माणाच्या कालावधीत (आणि नंतरही) होत असतो.
आता पुढचा अधिक महत्त्वाचा बिंदू असा की नवीन संशोधनात हे प्रूव्ह झालेलं आहे की मूल जल्माला घालण्यापलिकडे बौद्धिक कुवतीसंदर्भात जन्मदात्यांचा काहीही रोल नसतो. म्हणजे पालक असे असे आहेत म्हणून मूल असं आहे, असा स्कोप फार म्हणजे फार मायन्यूट असतो. आणि तो मुख्यतः शारीरिक ठेवणीबाबत आढळून येतो.
संशोधनात असे आढळून आले की, एखादे अनाथ मूल दत्तक घेतले गेल्यावर त्या घराची आयुष्यपद्धती स्विकारते आणि त्याच्या आयुष्याची गती त्या कुटुंबातील सदस्यांप्रमाणेच, त्यांच्या विचारपद्धती प्रमाणे बदलते, पुढे जाते. त्याच्या biological पालकांचे गूण अवगूण त्याच्यावर परिणाम करेनासे होतात. हेच मूल अजून वेगळ्या घरात गेलं असतं तर अजून वेगळं झालं असतं. त्याच्या जन्मदात्यांबरोबर राहिलं असतं तर त्याचं व्यक्तीमत्व त्यांच्यासारखं झालं असतं. अहो, एखाद्या कुटुंबातील genetical disorders सुद्धा दत्तक मुलांच्यात आढळलेल्या आहेत! आता बोला!
आपण लोकांना बोलताना ऐकतो, ‘मला डायबेटीस होणारच कारण आमच्या तीन पिढ्यांमधे हा रोग आहे. It's a generic disorder’. पण संशोधन असं सांगतं की, असं काही नसतंच मुळी. तुमचा आहार, तुमची आयुष्यपद्धती, तुमची विचारपद्धती, मानसिक ताकद या गोष्टी तुमच्या शरिरावर परिणाम करतात. आत्या, काका, मामा, मावशी, पालक, आजीआजोबा यांचे रोग, गूण अवगूण नाही. मनुवादाची उपयुक्तता संपते ती या कारणांमुळे. राजकीय खेळी, जातीपातीच्या भांडणांमुळे नाही. असो. तो वेगळा मुद्दा आहे.
तुमचे, तुमच्या मुलांचे आरोग्य, तुमची, त्यांची बुद्धिमत्ता, उत्तम, सुरक्षित भविष्य हे केवळ आणि केवळ तुमच्या हातात आहे पण तुमचा DNA सेम आहे म्हणून नव्हे.
तर, पालकांसाठी पालकत्व ही एक मोठी संधी असते. आणि मुलांसाठी ‘घडत जाणं’ ही एक फार मोठी उपलब्धी असते. या वेळाचा, संधीचा सुयोग्य वापर करून घेणे, आपली, कुटुंबाची उंची वाढवणे हे तुमच्याच हातात आहे म्हणून.!
Aptitude tests मधे अनेक लूपहोल्स असतात. पण focused efforts कुठे आणि कसे घ्यायचे याचं मार्गदर्शन मिळू शकते. अर्थातच तुमचा नीरक्षीरविवेक जाग्रुत ठेवायलाच हवा.
मुलांशी नियमीत, सखोल संवाद हा एक मोठा आधार, प्लसपाॅईंट असतो. तेव्हा ते तेव्हडं जमवून आणा.
आणि केतकीबैंसारख्या एक ना धड भारभर.. चं काही ऐकत जाऊ नका राव..
आणि हो, ते घराणं, कुलदिवा, रक्त वगैरे बाबींतून बाहेर पडूया आता. जग कुठे चाललंय आणि आपण काय करतोय!( general statement)
हा विषय खूप मोठा आणि खोल आहे. तुमच्या काळजीमुळे थांबते. 😉
एक personal गम्मत सांगते. मी आजचं एका गोडुगोडुली, मऊमखमल, टिचकीभर चिंगुटलीची आत्या झालीये. 👼👶😍😇😊😍💃 Life is a pure bliss..
#अमिता
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा