South China Sea

           दक्षिण चायना समुद्र नक्की कुठे आहे? चीनच्या खाली दक्षिणेला चीन , तैवान, व्हिएतनाम, फिलिपीन्स आणि  मलेशिया यांच्या मध्ये असलेल्या  समुद्री भागाला  दक्षिण चीन समुद्र म्हणतात . या समुद्री भू-भागावर अधिपत्य गाजवण्याची धोरणात्मक अथवा  व्यूहात्मक भूमिका , त्या समुद्राच्या सभोतालच्या देशांची विविध कारणासाठी आहे. यात  असणारी बेटेही  विशेष महत्वाची आहेतस्कार्बोरफ  या बेटावर चीन आणी फिलिपीन्स दोघानीही दावा सांगितलं आहे. तसेच स्पार्टलेज   पॅरासेल  नावाची बेटे आहेत. या सर्व देशांच्या मागण्या दावे समजून घेण्यासाठी  याचा थोडा इतिहास समजून घेऊयात.

       चीनमध्ये दोन ते चार हजार वर्षांपूर्वी झीया हान या वंशाच्या राजांचे राज्य होते दक्षिण चिनी समुद्र यांच्या अधिपत्याखाली होता असे चीनचे म्हणणे आहे., म्हणून ते यावर आपलाच हक्क सांगतात.

      एकोणीशे सत्तेचाळीस साली चियॉन शेक या चिनी नेत्याने 'नाईन डॅश लाईन' नावाचा सीमा करार केला. या वेळी चीनने हा समुद्री भाग आमच्या ताब्यात आहे असे घोषित केले जो एक स्वयंघोषित एकट्याचा निर्णय होता, त्यात उर्वरित इतर देशांचा कोणताही सहभाग नव्हता. या घोषणेमुळे जवळ जवळ ऐशी ते नव्वद टक्के भाग त्यातील बेटांसहित आपल्या ताब्यांत घेण्याच्या त्यांच्या प्रयत्नांचे पहिले पाऊल पडले. यानंतर जवळ जवळ एकोणीशे  त्र्याहत्तर पर्यंत याविषयी कोणीही म्हणजे चीनने सुद्धा फारसा  रस दाखविला नाही. पण त्र्याहत्तरसाली युनाइटेड नेशन कन्व्हेंशन ऑन लॉ ऑफ दी सी (यू सी ) ठराव करण्यात आला, जे देशांनी केलेलं तह किंवा करार असतील ज्यामुळे समुद्री सीमा तंटे उद्भवले आहेत, असे तंटे सोडविण्यासाठी केला गेलाया काळात   'यू सी ' ची जी अधिवेशने झाली ती त्याची नियमावली आणि करारांच्या दृष्टीने महत्वाची होती. यात तटापासून पुढे समुद्राचा किती भाग एखाद्या देशाच्या ताब्यत राहणार याविषयीची नियमावली सुद्धा ठरवली गेली.

       आता आपल्याला सुद्धा माहित आहे कि चीनची भरभराट किंवा वाढ खूपच वेगाने होत आहे. आर्थिक, लष्करी आणी धोरणात्मक दृष्ट्याही चीन , तैवान, व्हिएतनाम फिलिपीन्स आणी मलेशिया या सर्व देशांना या समुद्राची गरज महत्व फार तीव्रतेने जाणवले.

      समुद्री तळाशी  असलेले तेल आणि  समुद्री व्यापार मार्ग आणि  उत्पन्न  हे दोन महत्वाचे  घटक या समुद्राच्या  मालकीसाठीच्या  स्पर्धेसाठी कारणीभूत ठरले. त्यामुळेच चीन , तैवान, व्हिएतनाम फिलिपीन्स आणी मलेशिया या सर्व देशांनी आपला हक्क सांगण्यास सुरुवात केली आणि त्यात चीनचा दावा सर्वात मोठा आहे. आपली दोन दशकाची वाढ कायम ठेवण्यासाठी चीनला या समुद्राची प्रचंड गरज आहेसाल दोन हजार नंतर या समुद्रावर हुकूमत मिळवण्यासाठी सर्व देशांमध्ये अहमहीका सुरु झाली.      

आता या  तंट्याचे स्वरूप दोन भागात पाहूया.

एक. समुद्राचा भौगोलिक दृष्ट्या अधिकार इतर  अधिकार याबतीत चीनने स्वघोषित केलेला  नाईन डॅश लाईन करार सर्वानी मानावा असे चीनला वाटते तर बाकीच्या  देशांना चीनचे नौदल तेथून उठावे असे वाटते आणि ते देश आंतराष्ट्रीयपातळीवर याची मागणी करत असतात. या समुद्रातील स्पार्टलेज पॅरासेल बेटे अंदमान बेटाच्या मानाने बरीच मोठी आहेत. या बेटांचा काहींना काही किंवा सर्व भाग ताब्यात यावा यासाठी सर्व देश प्रयत्नशील आहेत.

आता कोणता देश काय मिळवण्याचा दावा करीत आहे ते पाहू या.

) चीन - चीनचा नाईन डॅश लाईन कराराची घोषणा सर्व देशांनी मान्य करावी अशी चीनची मागणी आहे. या पलीकडे त्यांना काही हवे आहे काय या बाबत त्यांनी स्पष्टता आणली नाहीये .

) व्हिएतनाम - व्हिएतनामचा दावा असा आहे की स्पार्टलेज पॅरासेल बेटांचा ज्या इतिहासाचा पुरावा देत चीन हक्क सांगतो आहे तो खोटा आहे सतराव्या शतकापासून हि दोन्ही बेटे व्हिएतनामच्या ताब्यात होती. ते आपल्या दावा पुष्टीकरणासाठी ऐतिहासिक पुरावे हि सादर करतात.

) फिलिपीन्स - फिलिपीन्सचे म्हणणे असे आहे कि स्पार्टलेज बेटे हि भौगालिकदृष्ट्या या देशाच्या खूपच जवळ आगेत ते या बेटांवर अनेक दशके अधिकार सांगत आले आहेत भविष्यकाळातही ते आपला स्पार्टलेज बेटांवरचा अधिकार सांगतच राहतील. स्पार्टलेज बेटाच्या सर्वात वर उत्तरेला असणाऱ्या स्कारबोर बेटांचाही समावेश करतात. फिलिपीन्सने आंतरराष्ट्रीय लवादात आपली मागणी ठेवली आहे.

) मलेशिया - मलेशियाला समुद्र किनाऱ्याजवळचा समुद्राचा भाग हवा आहे स्पार्टलेज बेटांमधील काही बेटे हवी आहेत.

) ब्रुनई - या देशाला केवळ स्वतःच्या समुद्रतटाजवळचा समुद्री भाग हवा आहे. यू सी   करारात ठरल्याप्रमाणे त्यांचा हा अधिकार अबाधित व्हावा असे या देशाचे मागणे आहे.दक्षिण चिनी समुद्राचा भौगोलिक नकाशा येथे देत आहे. क्रमशः 

    

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट